Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ‘गांधी जागतिक सौर यात्रा’

खारघर : रामप्रहर वृत्त

महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यार्थी सौरदूत योजनेंतर्गत ‘गांधी जागतिक सौर यात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंतीनिमित्त गांधी जागतिक सौर यात्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत सौर दिवे बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली, तसेच एनर्जी स्वराज हा संवादपर कार्यक्रम आयोजित करून, लोकजागृतीसाठी हरित ऊर्जा स्रोत व हवामान बदल सौरऊर्जेचे उपयोग ऊर्जेत आत्मनिर्भरता, जागतिक सामंजस्य, याची माहिती देण्यात येऊन मुलांच्या बुद्धीला चलना देण्यासाठी पहिले सौरऊर्जेची साधने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एनर्जी सोलर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःचा सोलर बनविला. या कार्यशाळेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरच्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यशाळेस अंजली माने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पनवेल खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका राज आलोनी, भाजप नेते किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply