Breaking News

नवी मुंबई सुपर किंग जीपीएलचा विजेता

नवी मुंबई : बातमीदार

गवळी समाजातील गरीब, गरजू, आणि होतकरू तरुणांच्या मदतीसाठी गवळी समाज प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गवळी प्रीमिअर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा नवी मुंबई सुपर किंग संघ विजेता ठरला. या संघाने खेड वॉरियरचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर झालेल्या जीपीएल लीगमध्ये महाराष्ट्रातील एकूण आठ संघ सहभागी झाले होते. या लीगचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दूले, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर, नगरसेविका निधी शिंदे, विभागप्रमुख मंगेश सातमकर, महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष  विठोबा खेतल आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply