Breaking News

पेण येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच परीक्षा उत्साहात

अलिबाग :प्रतिनिधी
डायरेक्ट व्हॉलीबॉल  असोसिएशनची अखिल भारतीय पंच परीक्षा पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर येथे झाली.
प्रारंभी डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे पेण तालुका अध्यक्ष जगनशेठ म्हात्रे यांच्या  हस्ते सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील, अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे जनरल सेक्रेटरी दीपक मोकल, राज्य संघटक तथा राष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, सार्वजनिक विद्यामंदिरचे प्राचार्य मनोज पाटील, जिल्ह्याचे पंच सचिव रवींद्र म्हात्रे, अध्यक्ष प्रसन्नकुमार पाटील, पेण तालुका सचिव हिरामण भोईर, रायगड जिल्हा सदस्य रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी जगनशेठ म्हात्रे, बंडू खंडागळे, दीपक मोकल, शरद कदम, मनोज पाटील यांनी डायरेक्ट व्हॉलीबॉल  खेळाविषयी मार्गदर्शन करून हा खेळ खेडोपाड्यात पोहचावा व यातून उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा  व्यक्त करून हे खेळाडू जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करतील, अशा शुभेच्छा दिल्या.
सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील परीक्षार्थी या परीक्षेस बसले होते. सूत्रसंचलन रमेश म्हात्रे यांनी केले, तर आभार रवींद्र म्हात्रे यांनी मानले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply