हाँगकाँग : वृत्तसंस्था
गतवर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणार्या पुण्याच्या अवंतिका नराळेने शनिवारी (दि. 16) अभिमानास्पद कामगिरी केली. हाँगकाँग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकाने सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. तिने 11.97 सेकंदच्या वेळेसह 100 मीटर शर्यतीत बाजी मारली.
खेलो इंडियामध्ये अवंतिकाने 12.36 सेकंदासह सुवर्णपदक जिंकले होते. 11 वर्षांत तिने आपल्या वेळेत बरीच सुधारणा केली, पण अॅथलेटिक्स ही अवंतिकाची पहिली आवड नव्हती. ती पहिली कबड्डीपटू होती, परंतु तिच्यातील गती पाहता प्रशिक्षक शिवाजी मेहता यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. मेहनत करून तिने नाव कमाविले आहे.