Breaking News

वंचित बहुजन आघाडीतर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

नवी मुंबई ः बातमीदार

पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर नसून ती कामगारांच्या, कष्टकर्‍यांच्या तळहातावर आहे, हे सरकारला व जगाला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, पोवाडा व कथेद्वारे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुर्भे विभागातील इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली.

या वेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर विभागातील नागरिकांना फलाहार वाटप करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे बेलापूर तालुक्याचे उपाध्यक्ष दिपक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते  काशिनाथ पवार, तुर्भे तालुका उपाध्यक्ष दशरथ झोंबाडे, ऐरोली तालुका उपाध्यक्ष भाऊराव भालेराव, भगवान कांबळे, तुकाराम सावंत, मल्हारी खराटे, विलास लांडगे, अमोल कांबळे, पवन गायकवाड, खंडू कांबळे, फकिरा पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. गुरु सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply