Breaking News

हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तिरंगा शिवणकामात नवी मुंबई बचत गटाचा सहभाग

नवी मुंबई ः बातमीदार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार नवी मुंबई शहरात 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने नुकताच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक सूचना केल्या होत्या. दरम्यान 20 जुलै रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाले आणि समाज विकास बिभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहात पालिका हद्दीतील महिला बचत गटाची आढावा बैठक झाली.

स्वातंत्र्य मिळवून देणार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत  ’हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येणार असून नवी मुंबईत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बचत गटांनी विभाग निहाय तिरंगा रॅली, विविध स्पर्धेविषयी उपदेश करताना ज्या बचत गटाकडे मनुष्य बळ, शिलाई मशीन आणि शिवणकामाची आवड असलेल्या बचत गटास तिरंगा झेंडा शिवणकाम विषयी माहिती देण्यात आली होती.त्यानुसार विभाग निहाय काही बचत गट तसेच  पालिकेच्या वाशी आणि बोनकोडे येथील शिवणकाम  वर्गात शिवणकामाचे शिक्षण घेणार्‍या महिलांकडून तिरंगा झेंडा शिवणकामाचे काम  मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

तिरंगा झेंडा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी डोलाने फडकताना पाहत असे मात्र आज प्रत्यक्षात झेंडा आपल्या हातून शिवणकाम होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे. आपल्या देशाचा सैनिक देशसेवेसाठी चोवीस तास सीमेवर पहारा देवून देश सेवा करीत आहे. त्यामुळे आपणही काही वेळ झेंडा शिवणकामासाठी देवून  समाजसेवेचे काम करीत असल्याची भावना व्यक्त केली.

13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकणार आहे. आपल्या हातून शिवणकाम झालेला झेंडा घरावर लावले जाणार असल्यामुळे खूप आनंद वाटत आहे.

-मंगल गोळे, शिवराज्य प्रतिष्ठान महिला बचत गट

महापालिका हद्दीतील विविध भागातील महिलांना पालिकेच्या शिवणकाम केंद्रात शिवणकामाचे प्रशिक्षण देत आहे. दरम्यान समाज विकास विभागाकडून तिरंगा झेंडा शिवणकामाची विचारणा केल्यावर केंद्रातील 20 महिला उत्स्फूर्तीने तिरंगा झेंडा शिवणकाम करीत आहे.

-विद्या हलगे, प्रशिक्षक शिवणकाम केंद्र वाशी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply