पनवेल महापालिका एक लाख 25 हजार झेंडे खरेदी करणार
पनवेल ः प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी करीत आहे. या मोहिमेसाठी महापालिका एक लाख 25 हजार ध्वज खरेदी करणार आहे. नागरिकांना आपापल्या घरांवर ध्वज लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने मुख्यालयामध्ये आणि प्रभाग कार्यालयांतून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमात नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. नागरिकांमध्ये देशाबद्दल आदर वाढावा, एकोप्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार घरोघरी ध्वज लावण्यासाठी महापालिकेने एक लाख 25 हजार ध्वज खरेदी केले आहेत. ही खरेदी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडुन करण्यात आली आह काही संस्था, संघटना हे ध्वज खरेदी करून नागरिकांना भेट देऊ शकतात. या मोहिमेसाठी महापालिकेचे अधिकारी स्वयंप्रेरणेने काही ध्वज देणार आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्वतः 500 झेंडे दिले आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचारी 10 हजार झेंडे देणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण दोन लाख 94 हजाराचे झेंडे अधिकारी व कर्मचार्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
झेंडा फडकविण्याबाबतचे नियम
प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा संतिेचे पालन करावे, तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर नागरिकांनी सन्मानाने सुरक्षित ठेवावे. झेंडा अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेल्या परिस्थितीत झेंडा लावला जावू नये, नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबतचा फोटो (सेल्फी) पनवेल मनपाच्या फेसबुक अकाउंटला टॅग करावा.