Breaking News

सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पनवेल : बातमीदार

सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत सिडको प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने मंगळवारी खारघर येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

या कारवाईदरम्यान खारघर येथील भूखंड क्र. 56 व 57, सेक्टर 35 डी येथे अनधिकृत उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या तात्पुरत्या स्वरूपातील 15 झोपड्या पाडण्यात आल्या. अंदाजे 2050 चौमी इतके क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले, तसेच पापडीचा पाडा येथील भूखंड क्र. एन-1 ते एन-3, सेक्टर 39 येथे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेली 5 खोल्यांची चाळ व टपर्‍या पाडून अंदाजे चार हजार चौमीचे क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. खारघर येथील भूखंड क्र. 45, 46, 55 व 57, सेक्टर- 35डी येथील अनधिकृत टपर्‍या जमीनदोस्त करून दोन हजार चौमी इतके क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

सेक्टर 8 येथे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या 60 झोपड्या पाडून अंदाजे 10 हजार चौमी इतके क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. ही बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, सिडको महामंळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे पाडली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply