पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच सहशालेय उपक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा व शुभेच्छापत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या, तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे विद्यालयातील एनएसएस युनिटतर्फे शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय भोपी, माजी सदस्य प्रमोद कर्णेकर, ग्रामपंचायत कोअर कमिटी सदस्य श्याम पवार, मयुरेश पवार ग्रामस्थांच्या हस्ते 40 वृक्षांची तसेच फुलझाडांची लागवड करण्यात आली. मंदार जोग यांनी आद्य क्रांतिकारकांचे चरित्र आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर उभे केले. एनएसएस युनिटचे कार्यक्रम अधिकारी विवेक पाटील, गणेश पाटील, संगीता देशमुख यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, इंग्रजी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यमिक विभाग प्रभारी मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, मराठी माध्यमिक विभाग पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका संध्या अय्यर, उच्च माध्यमिक कला विभाग पर्यवेक्षक अजित सोनवणे, विज्ञान व वाणिज्य विभाग पर्यवेक्षक प्रशांत मोरे तसेच उपस्थित सर्व शिक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.