साळाव येथीलचव जेएसडब्ल्यू कंपनीचा उपक्रम
रेवदंडा : प्रतिनिधी
साळाव जेएसडब्ल्यू कंपनीने रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकताच बेबी वार्मर मशीन, अॅटोक्लव्ह, इसीजी मशीन, फ्लेटल डोपलर मशीन आदी साहित्याची भेट दिली. केंद्रातील कर्मचार्यांनी या आरोग्य साहित्याचा स्वीकार केला.
साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने सामाजीक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य साहित्याची भेट दिली. या वेळी जि. प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, कंपनीचे अधिकारी प्रविण बन्सल, सीएसआर विभाग मॅनेजर राम मोहिते, अर्पणा पाटील, मंगेश शेडगे, राकेश चवरकर आदी उपस्थित होते.