Breaking News

पालीत बल्लाळेश्वर जन्मोत्सव सोहळा; भाविकांची गर्दी

पाली :  प्रतिनिधी

अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पालीच्या  बल्लाळेश्वराच्या मंदिरात सोमवारी (दि. 2) गणेश जन्मोत्सव सोहळा धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी जन्मोत्सव सोहळ्याचा धार्मिक विधी सुयोग कोनकर, सुहास आपटे, चिन्मय कोनकर, हेरंब परब, अभिजित मराठे यांनी केला. मंदिराच्या गाभार्‍यात बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी  भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गणरायाच्या जयघोषाने पाली नगरी दुमदुमून निघाली.

जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराचा संपूर्ण गाभारा व बैठक हॉल फुलांनी सजविण्यात आला होता. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाईदेखील करण्यात आली होती. येथील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

बल्लाळेश्वर जन्मोत्सव सोहळ्याला देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहुल मराठे, व्यवस्थापक  चंद्रशेखर सोमण, समीर पाडावे आदिंसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी नाममात्र दरात प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन भक्त निवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन पार्किंग आहेत. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे.

-अ‍ॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply