Breaking News

रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग ः सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवर होणारे हल्ले तसेच रुग्णालयांमधील इतर घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 14 रुग्णालयांत 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास 14 रुग्णालयांचा यात समावेश आहे. सध्या जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, मुख्य प्रवेशद्वार, शस्त्रक्रियागृह परिसर, अपघात वैद्यकीय अधिकारी कक्ष यांसह अन्य आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालयांत एक कॅमेरा बसविण्यात येणार आहे.

यासाठी 14 लाख 60 हजार रुपयांचा खर्च येणार असून, राज्य सरकारने यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. रायगड जिल्हा रुग्णालयात 21 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात 17, पेण रुग्णालयात 4, रोहा 6, तर श्रीवर्धनच्या रुग्णालयात 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उरण, पनवेल, महाड, कशेळे, जसवली, पोलादपूर, मुरूड, चौक, म्हसळा या रुग्णालयांत प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply