Breaking News

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

11 ऑगस्ट रोजी घेणार शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी शनिवारी (दि. 6) मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला असून ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. जगदीप धनखड यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या (यूपीए) उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात शनिवारी लढत झाली. जगपदीप धनखड यांना 528 मते तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. धनखड 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजाचे आहेत.
अल्वा या काँग्रेसच्या 80 वर्षीय ज्येष्ठ नेत्या असून, त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमताचे प्रयत्न झाले नाहीत, असा दावा करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले. त्याचा फायदा जगदीप धनखड यांना झाला.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply