Breaking News

आज जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार दिनांक 11 मे) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा होणार आहे.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणारी ही स्पर्धा 15 ते 17, 12 ते 14, 9 ते 10 आणि 11 वर्षाखालील मुले व मुली अशा गटात होणार आहे. ग्रुप 1 व 2 मध्ये फ्रीस्टाईल 50, 100, 200, 400, 800 आणि 1500 मीटर, बॅक स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50, 100 व 200 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 व 400 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 100 मीटर व 4 बाय 200 मीटर, मिडले रिले 4 बाय 100 मीटर, ग्रुप 03 मध्ये फ्री स्टाईल 50, 100 व 200 मीटर, बॅक स्ट्रोक 50 व 100 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50 व 100 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50 व 100 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 50 मीटर, मिडले रिले 4 बाय 50 मीटर, ग्रुप 04 मध्ये बॅक स्ट्रोक 50 व 100 मीटर, ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर, बटरफ्लाय स्ट्रोक 50 मीटर, इंडिव्हिज्युल मिडले 200 मीटर, फ्री स्टाईल रिले 4 बाय 50 मीटर, मिडले रिले 4 बाय 50 मीटर, अशा प्रकारात स्पर्धा होणार असून वॉटर पोलो स्पर्धाही होणार आहे.

या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply