कर्जत : बातमीदार

माथेरान फिरून घरी परतत असताना दोन प्रेमीयुगलांच्या दुचाकीने समोरून येणार्या वाहनाला धडक दिल्याची घटना माथेरान घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणार्या प्रियकराला जबर मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार हे प्रेमी युगल माथेरान फिरण्यासाठी रविवारी आले होते. माथेरान फिरून झाल्यानंतर परतीच्या दिशेने परतत असताना माथेरान घाटातील जुमापट्टी या उतारावर त्यांचा वाहनवरील ताबा सुटल्याने समोरून येणार्या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघातात एवढा जबर होता की चार चाकी वाहनाचा पुढचा दर्शनी भाग आतल्या बाजूस गेल्याचे दिसत आहे. दुचाकीवरील प्रियकराचे नाव सनी जाधव असून त्याच्या पायाचे तीन ठिकाणी हाड मोडले आहे तर डोक्याला जबर मार असल्याचे डॉक्टरांनी तापसांअत्ती सांगितले, मागे बसलेल्या प्रियसीला देखील मार बसला असल्याने तिला बदलापूर येथे हलवण्यात आले.
धक्कादायक म्हणजे हे प्रेमीयुगाल आपल्या घरच्या विना परवानगी माथेरान फिरण्यासाठी आले असल्याची माहिती समोर आली असून प्रेयशी ही वांगणी येथील आहे. तर प्रियकर हा मुळचा मुरबाड येथील राहणारा असून तो सध्या अंबरनाथ येथे राहत आहे. अपघातात झालेले वाहनदेखील मित्राचे असल्याची माहिती समोर आली आहे.
माथेरान घाटात काही दिवसांपूर्वी आणखी एका चार चाकी वाहनवरील वाहनचलकाचा ताबा सुटून अपघात घडल्याची घटना घडली होती. माथेरान फिरण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात प्रेमी युगल हे दुचाकीवर येत आहेत. तसेच घाटात प्रियसीला सोबत घेऊन दुचाकीवर स्टंट बाजी करत असल्याचे चित्र समोर येत आहेत. यातूनच हा अपघात घडला असल्याचे समजते.