Breaking News

सीकेटी संकुलात नुतन उपहारगृह सुरू

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) संकुलात नुतनीकरण झालेल्या उपहारगृहाचे उद्घाटन सोमवारी (दि. 8) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, समीर ठाकूर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी परेश ठाकूर यांनी या वेळी उपगृहाचे संचालक दिनेश बहिरा यांना उपहारगृहात योग्य त्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि खाद्यपदार्थ्यांच्या दर्जाबाबत कधीही तडजोड करू नका, अशा सूचना केल्या.

या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, तसेच सीकेटी शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply