रांची : वृत्तसंस्था
मोदी तर जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केले आहे. ते झारखंडच्या कोडरमा येथील एका प्रचार सभेला संबोधित करीत होते.
तीन टप्प्यांतील मतदानानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चौथ्या टप्प्यानंतर त्यांचा पराभव अटळ आहे. आता ते मोदी जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही अशा अफवा पसरवित आहेत. त्यांच्या या अफवेला बळी पडू नका. जर मोदी जिंकत आहेत, तर त्यांना आणखी मतदान करा आणि प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन मोदींनी केले.
आघाडी सरकार बनवून त्यांना देशात घोटाळे करायचे आहेत, असा आरोप करतानाच आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली म्हणून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यास सुरुवात करण्यात आली, पण भ्रष्टाचार्यांवरच्या कारवाया आम्ही थांबवणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. देशाच्या विकासासाठी मजबूत आणि स्थिर सरकार देण्याचे आवाहनही त्यांनी केले.