पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायतीअंतर्गत कोपर येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले असून याचे काम पुर्ण झाले आहे. त्यानुसार या सभागृहाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.15) झाले.
उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरव्यामुळे 25-15 निधीमधून कोपर येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे काम मंजुर झाले होते. त्याअंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी खर्चून हे काम पुर्ण झाले असून याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठनेते जे.एम.म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
दरम्यान, या वेळी या बहुउद्देशिय सभागृहात विविध साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गव्हाण ग्रामपंचायत 14 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या सभागृहाच्या उद्घानावेळी ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विरेंद्र पाटील, सदस्य सागर ठाकूर, माजी सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सदस्या योगीता भगत, भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, हेमंत ठाकूर, वामनशेठ म्हात्रे, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, कोपर गाव अध्यक्ष वैभव घरत, अण्णा घरत, भाऊ भोईर, रघुनाथ देशमुख, सुभाष देशमुख, दर्शन भोईर, गजानन घरत, दयानंद घरत, कैलास घरत, किशोर पाटील, जयश्री घरत, ग्रामसेवक विजयकुमार राठोड, युवासेना जिल्हा प्रमुख मनोज घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper