वेदा शेठ, वैभव शिंदे विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहर युवा मोर्चा आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक 2019 कॅरम स्पर्धेत महिला गटात वेदा शेठ (पनवेल), तर पुरुष गटात वैभव शिंदे (कामोठे) यांनी विजेतेपद पटकाविले.
सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल शहर भाजप सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील यांच्या नियोजनाखाली पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात झालेल्या या दोन दिवसीय कॅरम स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलिबाग, उरण, कर्जत, पेण, पनवेल अशा अनेक भागातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि. 18) झाला.
या वेळी पनवेलचे ज्येष्ठ कॅरमपटू नंदू मानकामे, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच सुहास कारभारी, भाजप सोशल मीडिया सेलचे पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, विलय शहा, तुषार कापरे आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
गटनिहाय विजेते
महिला गट-वेदा शेठ (पनवेल) प्रथम, प्रज्योती गावंड (अलिबाग) द्वितीय, रूपाली बावा (पनवेल) तृतीय; पुरुष गट-वैभव शिंदे (कामोठे) प्रथम, सुरेश बिस्ट (कामोठे) द्वितीय, सुरज काजरोलकर (उरण) तृतीय, अतिष कल्याणकर (पनवेल), रोशन काजरोलकर (उरण), देवेन सिनकर (अलिबाग), अश्रफ खान (पनवेल), प्रवीण म्हात्रे (कामोठे) सर्व उत्तेजनार्थ.