मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील एक बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली होती, पण जोरदार वारा व लाटांच्या मार्यामुळे ही बोट सरकत सरकत पुढे येऊन अडकून पडली. या बोटीवर एकूण 10 जण होते. मदत मिळावी म्हणून बोटीमधील खलाशी फोनद्वारे मुरूड पोलिसांशी संपर्कात होते. पोलिसांनी सर्वांना आधी धीर दिला आणि सातत्याने पाठपुरावा करून कोस्टगार्डच्या मदतीने हेलिकॉप्टर मागवून बुधवारी
(दि. 10) सकाळी त्यांना सुखरूप किनार्याला आणले.