महाड : प्रतिनिधी
भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव या सेलच्या वतीने महाडमध्ये मुलींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांचे हे प्रशिक्षण पुर्ण करणार्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
आजच्या स्पर्धेच्या युगात महिल आणि मुलींना शिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. अशात काही संकट आले तर त्यातून कसा बचाव करायचा, याचे मोफत प्रशिक्षण भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव सेलच्या जिल्हा संयोजिका निलीमा राजेय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवस झालेल्या या स्वरक्षण प्रशिक्षणात अनेक मुलींनी सहभाग घेतला होता. विठ्ठल नातेकर आणि वैभव सकपाळ यांनी हे प्रशिक्षण दिले.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, मंजुषा कुद्रीमोती, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, सरचिटणीस महेश शिंदे, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रश्मी वाझे, वाहतूक सेल अध्यक्ष नाना पोरे, डॉ. नितीन मिंडे, युवा मोर्चा सुमित पवार, शहर अध्यक्षा नमिता दोशी, आराधना इंगळे, प्रिया खोडके, अदिती ताडफळे, वृषाली साठे, विश्वतेज भोसले आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी तालुका संयोजिका कल्पना विचारे, प्राजक्ता दळवी, कोमल शेठ, नंदिनी मोरे, अभिषेक कुलकर्णी, वैदही साठे, मंजिरी कुलकर्णी, निकीता दळवी, सुनंदा माने यांनी विशेष परिश्रम घेतले.