Breaking News

नेरळमध्ये भाजपकडून ध्वजवाटप

कर्जत : बातमीदार

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेरळ गावातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकावा,  यासाठी नेरळ शहर भाजपच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून हर घर झेंडा.. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्याचा भाग म्हणून नेरळ भाजपकडून तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. त्यासाठी रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरळ गावासाठी 500 तर नेरळ भाजपने 500 तिरंगा झेंडे आणले होते. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष आणि नेरळचे उपसरपंच मंगेश म्हसकर यांच्या हस्ते जकात नाका येथून तिरंगा ध्वज वितरण कार्यक्रम सुरू करण्यात आला.

नेरळ बाजारपेठेमधील दुकानात जावून तसेच प्रत्येक वाटसरूंना भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज वितरित केला. मंगेश म्हसकर यांच्यासह नेरळ भाजप अध्यक्ष अरुण नायक, माजी अध्यक्ष अनिल जैन, ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी, संतोष शिंगाडे, भाजप युवा मोर्चाचे खेडकर, तसेच शंकलेश गदिया, प्रभाकर पवार, योगेश ठक्कर, राकेश तिवारी, प्रकाश पेमारे, गणेश गिर, विमल व्यास आदी कार्यकर्त्यांनी नेरळ गावात एक हजार तिरंगा झेंड्याचे वितरण केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply