Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे

मुंबई :  प्रतिनिधी
भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जामंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर 2014मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर यंदा नागपूर विधान परिषद निवडणुकीत बावनकुळेंना संधी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत बावनकुळेंना पक्षसंघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवनियुक्त भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार पेशाने वकील असून त्यांनी यापूर्वी दोन वेळा मुंबई भाजपचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळलेले आहे, तर फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री म्हणून काम पाहिले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Check Also

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …

Leave a Reply