पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) झाले. ही स्पर्धा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणात पाच दिवस रंगणार असून स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चांगले काम चालले आहे हे सगळ्यांना समजते, मात्र सिडकोच्या ते लक्षात का नाही येत, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल, असे मत व्यक्त केले तसेच ग्राऊंडला हिरावून घेण्याची हिंमत सिडको करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तम कोळी, आशिष पाटील, अनंताशेठ ठाकूर, भाऊ भोईर, आयोजक सचिन घरत, भाजप नेते सुधीर ठाकूर, समीर पाटील, अमर पाटील, अमर कडू, रवी भोईर, किशोर पाटील, चेतन घरत, तेजस म्हात्रे, निलेश खारकर, भास्कर घरत, शैलेश पाटील, प्रमोद कडू, धीरज ओवळेकर, मनोज नाईक आदी उपस्थित होते.
Check Also
दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …