कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार
तालुका भारतीय जनता पक्ष, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कर्णदोष असलेल्या रुग्णांना श्रावणयंत्र भेट देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 52 रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले.
शिबिरात 60 नागरिक यांनी तपासणीसाठी नोंद केली होती. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर 52 रुग्ण यांच्या कानात दोष आढळले होते आणि त्यामुळे त्यांना ऐकण्यात कमी येत होते. शेवटी श्रवण दोष असलेल्या 52लोकांना 500 रुपयात श्रवणयंत्र देण्यात आले. या शिबिरासाठी खेड्यापाड्याडून गरज रुग्ण आले होते. शेवटी त्या सर्व रुग्णांना अत्यल्प दरात श्रवण यंत्र देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे यांचे कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिराला भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, तसेच शहर अध्यक्ष दिनेश सोळंकी, मारुती जगताप, समीर सोहोनी, प्रकाश पेमारे, दिनेश गणेगा राव, प्रशांत उगले, सर्वेश गोगटे, अभिनय खांगटे, मुनीर धानसे फैझान पटेल, अकबर कारंजीकर, भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, महिला तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, तसेच पुनम डेरवणकर आदी उपस्थित होते.