Breaking News

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ व संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कार्निवल ग्रुप, इंडियाच्या कार्निवल मोशन पिक्चर्सच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली सरवणकर ह्या सिंगापूरमध्ये जवळपास एक दशकासाठी विविध व्यवसाय विकास व नेतृत्व करून भारतात परत येत आहेत आणि या विभागातील कंपनीच्या संपूर्ण संरचनेत सर्वसमावेशक बदल घडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या माध्यमातून मध्यम बजेटचे चित्रपट बनविण्यावर जोर देणार असून, ज्यामध्ये नवीन प्रतिभा आकर्षित करण्याचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच फिल्मी जगात हेल्दी इको-सिस्टम विकसित करण्यावरही त्या लक्ष केंद्रित करणार आहेत. आणि त्याचा अहवाल त्या कार्निवल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी यांना कळवणार आहेत. कार्निवल स्टुडिओ सध्या हिंदी चित्रपटाची निर्मिती करीत आहे, जो या वर्षाच्या जूनपर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस स्टुडिओद्वारे निर्मित दोन प्रादेशिक चित्रपटदेखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून 2021 मध्ये स्टुडिओद्वारे अनेक चित्रपट मालिकांचे निर्माण होणार आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी वैशाली सरवणकर यांनी कार्निवल मूव्हीज इंटरनॅशनल प्रायव्हेटसाठी दोन वर्षे सीईओ, दिग्दर्शक म्हणून दक्षिण पूर्व एशिया, उत्तरी एशिया, श्रीलंकामधील फिल्म वितरण बाजाराचा विस्तार केला आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply