Breaking News

उरण येथे स्वातंत्र्य दिन साजरा

उरण : वार्ताहर

भारतीय स्वातंत्र्य दिन उरण शहरात सर्वत्र साजरा करण्यात आला. उरण नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळेस तंबाखू मुक्त अशी शपथ देण्यांत आली. त्याच प्रमाणे नगर परिषद भवरा समाज मंदिर, प्राथमिक शाळा क्र. 1 व 2, प्राथमिक शाळा मोरा येथेही प्रशासक तथा मुख्याधिकारी  संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, कनिष्ठ अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी,  माजी स्वतंत्रसैनिक संजय पवार, उरण नगरपरिषद कर्मचारी विजय पवार आदी उपस्थित होते. उरण तहसील कार्यालयाच्या परांगणात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस अधिकारी, नायब तहसिलदार(महसूल) नरेश पेढवी, निवासी नायब तहसीलदार गजानन धुमाळ, सैनिक रामनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.दरम्यान, ग्राईडवेल नॉर्टन मोरा येथे ध्वजारोहण करून अ‍ॅडमिनचे मॅनेजर आय. बी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा गावात रॅली काढण्यात आली. ग्राईडवेल परिवार सहभागी झाले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply