कळंबोली : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती अमर पाटील यांच्या वतीने निवृत्त जवानांचा गौरव कळंबोली येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात अती उत्साहात करण्यात आला. यावेळी नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा येथून 40 निवृत्त जवानांनी उपस्थित लावली होती. या वेळी निवृत्त जवानांनी आपल्याला येत असलेल्या वाईट अनुभवांचा पाढा वाचला. आणि आमच्यावर होत असलेल्या अन्याय वरिष्ठा पर्यंत पोहचविण्याची विनंती यावेळी केली. या वेळी अमर पाटील यांनी सांगितले, मी आपल्या समस्या कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समोर ठेवणार आहे आणि त्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून नक्कीच प्रयत्न करण्यात येतील. असा मी विश्वास देतो. या कार्यक्रमात माजी सभापती प्रमिला पाटील, कळंबोली भाजप महिला अध्यक्ष मनीषा निकम, भाजप महिला सरचिटणीस दुर्गा साहनी, भाजपा महिला उपाध्यक्षा प्रियांका पवार, भाजपा महिला अध्यक्ष सुलभा ठाकरे, कळंबोली चिटणीस निता अधिकारी आदीच्या सहकार्यातून या जवानांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.