Breaking News

‘रोटरी’तर्फे पोलिसांसाठी मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर असतात. अशा व्यक्तींच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेल परिसरातील विविध रोटरी क्लबने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील एक भाग म्हणून शुक्रवारी (दि. 27) पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी रोटरीने मास्कसह सॅनिटायझरचे वाटप केले. पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावीत असताना वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात येतात. त्यांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पनवेल परिसरातील सर्व रोटरीने एकत्र येऊन मास्कसह सॅनिटायझरचे वाटप पनवेल शहर पोलीस ठाण्यात केले. यापुढेही पनवेलमधील नाका कामगार तसेच गोरगरीब नागरिकांना रोटरीच्या माध्यमातून जेवण पुरवले जाणार असल्याची माहिती रोटरीचे डॉ. परमार यांनी दिली.

Check Also

साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी

असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …

Leave a Reply