Breaking News

उरण येथे आमदार चषक जलतरण स्पर्धेस प्रतिसाद

उरण : वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, हौसी जलतरण संघटना आणि आलोक अ‍ॅक्वा इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे रविवारी (दि. 15) आमदार चषक जलतरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत नऊ गटांमध्ये 210 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका अध्यक्ष व नगरसेवक  रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक  धनंजय कडवे, राजेश ठाकूर, जि. प. सदस्य विजय भोईर, मुख्यधिकारी संतोष माळी, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल पाटेकर, हौसी जलतरण संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, हितेश शाह आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रूपाली रेपाले यांनी मार्गदर्शन करून मुलांचे कौतुक केले. प्रत्येक गटात तीन बक्षिसे देण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply