Breaking News

पनवेलमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत अनिशा पात्रा, लोकेश पटवा विजेते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच नवीन पनवेल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महिला एकेरीत अनिशा पात्रा आणि पुरुष एकेरीत लोकेश पटवा यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. बक्षीस वितरण समारंभास लायन्स क्लबचे विजय पाटील, स्पोर्ट्स डिस्ट्रीक्ट चेअरमन संजीव सूर्यवंशी, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, सेक्रेटरी नंदकिशोर धोत्रे, स्पोर्टस प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र जेसवानी, संजय पोतदार, नागेश देशमाने, अशोक गिल्डा, मधुकर भगत, के. एस. पाटील, मदन गोवारी़, संजय गोडसे, मनोज म्हात्रे, गौतम म्हस्के, माजी अध्यक्ष मीना पोतदार, ज्योती देशमाने, भावना जेसवानी, शोभा गिल्डा, नूतन धोत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
कै. मोरेश्वर सदाशिव पोतदार व कै. मंगला मोरेश्वर पोतदार यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे पुरुष व महिला विजेत्यास फिरता चषक देण्यात आला. स्पर्धेचे चीफ रेफरी म्हणून पराग अंकोलेकर यांनी काम पाहिले.
गटनिहाय विजेते व उपविजेते
नवोदित : मुली-त्रिशा पावशे, आदिती सागर भगवते, मुले-आरूश जैन, दर्श राजाध्यक्ष, 11 वर्षाखालील : मुली-त्रिशा पावशे, स्वरा खराडे, मुले-शिवेश तांबोळी, अद्वित गुप्ता, 13 वर्षाखालील : मुली-वेदिका भगत, ईशा जाधव, मुले-हर्षद कुदाळे, अखिल नायर, 15 वर्षाखालील : मुली-अनिशा पात्रा, आदिती जाधव, मुले-स्वस्तिक कुंडू, ऋषी चव्हाण, 17 वर्षाखालील : मुली-अनिशा पात्रा, आदिती जाधव, मुले-विवेक पाल, ऋषी चव्हाण, 19 वर्षाखालील : मुली-अनिशा पात्रा, क्रिशिका धांडे, मुले-मैत्रेय सचिन नाईक, हृदय कंपनी, महिला एकेरी-विजयी अनिशा, आदिती जाधव, पुरुष एकेरी-लोकेश पटवा, सौरव चतुर्वेदी, 13 वर्षाखालील मुली दुहेरी-वेदिका भगत व रूद्रा सरवणकर, ईशा जाधव व अनन्या मराठे, मुले दुहेरी-अव्यांत तांबे व अखिल गुब्बाला, संस्कार पाटील व लौकिक नाईक, 15 वर्षाखालील मुली दुहेरी अनिशा पात्रा व क्रिशिका धांडे, श्रावणी कुदाळे व ईशा जाधव, मुले दुहेरी-मयांक जैन व प्रियांशु जैन, प्रियांश कोहाडकर व श्लोक पाटील, पुरुष दुहेरी-नवीन नातू व रिषभ साळसकर, विलास धांडे व निकोलस दास, ज्येष्ठ पुरुष-नवीन नातू, अतुल देशमुख.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply