Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शहरातील चिंतामणी हॉलमध्ये गुरुवारी (दि. 5) झाला. 

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेेचे नगरसेवक तथा भाजपचे शहर सरचिटणीस आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्फत विविध सामजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्यानुसार पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चिंतामणी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप महिला मोर्चा तालुका सरचिटणीस लीना पाटील, उमेश ईनामदार यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत नितीन पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम अभिमानास्पद असलेल्याचे मत व्यक्त केले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply