Breaking News

नवे कोरोनाबाधित आता ‘इंडिया बुल्स’मध्ये होणार क्वारंटाइन

पनवेल, खारघर ः प्रतिनिधी

शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे शुक्रवार (दि. 28) पासून महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रुग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे. याआधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांचे गृहविलगीकरण केले जात होते, परंतु शासन आदेशानुसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवीन कोरोना रुग्णांना गृहविलगीकरण करण्याऐवजी क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेने इंडिया बुल्स येथे आवश्यक असणार्‍या सोयीसुविधा वाढविल्या आहेत  तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टर्स, नर्स, औषधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या ट्रेसिंग टीम, मोबाइल टीममधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यामार्फत रुग्णांना इंडिया बुल्स येथे संदर्भित करण्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी निर्गमित केले आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply