Breaking News

कर्जतमधील नवज्योत देशमुख ‘आयर्न मॅन’

कर्जत ः बातमीदार
कझाकस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या नवज्योत मारुती देशमुख या क्रीडापटूने आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. नवज्योत हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटल पाली गावचा सुपुत्र आहे. या स्पर्धेत सलग 3.8 किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणार्‍या वार्‍याविरुद्ध 180 किमी सायकलिंग करणे आणि लगोलग 42.2 किमी धावणे ही आव्हाने पूर्ण करायची असतात. नवज्योतने सर्व आव्हाने 13 तास 30 मिनिटांत पूर्ण केली.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply