नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
अयोध्याप्रकरणी मध्यस्थी करणार्या समितीने काल सर्वोच्च न्यायालयात सीलबंद अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर समितीने मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मागितली असता न्यायालयाने या समितीला मुदतवाढ दिली. त्यामुळे अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता तीन महिने लांबणीवर पडली आहे. मध्यस्थ प्रक्रियेच्या आदेशानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी मध्यस्थ प्रक्रिया समितीचे अध्यक्ष कलीफुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा सीलबंद अहवाल सादर करून मध्यस्थी प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मागितली असता न्यायालयानेही खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.