खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील टाटा कंपनी कॉलनी ते शिंग्रोबा मंदिर मार्गावर अज्ञात वाहनाच्या इंधन टाकीतून शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑइल गळती झाली. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन 10 ते12 मोटारसायकल घसरून पडल्या. त्यात किमान 10 जणांना किरकोळ स्वरुपात जखमा झाल्या.
या बाबतची माहिती मिळताच खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते व मदत ग्रस्त टीम घटनास्थळी दाखल झाली व निसरडा झालेल्या रस्त्यावर माती टाकून मार्ग पुर्ववत केला. खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून ऑईल धुवून काढल्यानंतर या महामार्गावरुन वाहतूक सुरू झाली.