Breaking News

माणगावमध्ये श्री सांप्रदायाने राबविले स्वच्छता अभियान

माणगाव : रामप्रहर वृत्त

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने माणगाव तालुका सेवाकेंद्राच्या वतीने सामाजिक उपक्रम सेवेअंतर्गत जुने माणगाव येथील श्री स्वयंभू  संगमेश्वर  देवस्थान परिसरमध्ये  नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून  सकाळी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाकरिता  विजय मेहता, नगरपंचायतीचे पाणीपुरवठा  सभापती  राजेश  मेहता, सचिन  गोरेगावकर, मनोहर  पिसाट, जितेंद्र दोशी,  राजाराम टेबे या वेळी उपस्थित होते.  श्री सांप्रदायचे गुरुनाथ कामत यांनी  प्रास्ताविक केले. सुधीर पुळेकर यांनी उपक्रमाबाबत व संस्थेबाबत माहिती दिली. या स्वच्छता अभियानात श्री सांप्रदायचे बहुसंख्य गुरुबंधू व भगिनी सहभागी  झाले होते. त्यांनी श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान परिसर स्वच्छ केला. श्री सांप्रदायचे ज़िल्हा निरीक्षक सुनील वीर व महिला जिल्हाध्यक्षा अंजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नंदकुमार टेबे, संतोष पोतदार, प्रकाश मेहता,  योगिता धाडवे, झुलू डवले यांनी विशेष सहकार्य केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply