Breaking News

पोलादपूरच्या सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल; नरवीर रेस्क्यू टीमचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टिम तर्फे मंगळवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. या वेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित दरेकर यांच्यासह टिमचे सदस्य उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नरवीर रेस्क्यू आणि अ‍ॅडव्हेंचरच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने रानबाजिरे धरण ते लोहारमाळ-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टींगची ट्रायल रन घेण्यात आली, असे रामदास कळंबे यांनी सांगितले.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply