Breaking News

कर्जतमध्ये दोन दिवस भीम महोत्सव

कर्जत : बातमीदार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील बहुजन बांधव यांच्या माध्यमातून 29, 30 एप्रिल रोजी कर्जतच्या पोलीस परेड मैदानावर भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात दोन वर्षे भीम महोत्सव आयोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे या वर्षी बहुजन समाजात भीम महोत्सवाबाबत उत्सुकता आहे. कर्जत तालुका भीम महोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वा जयंती उत्सव साजरा होत आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्षे असून मागील दोन वर्षे कोरोनामुळे भीम महोत्सव आयोजित करण्यात आला नव्हता. त्यापूर्वीच्या भीम महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावर्षी 29 एप्रिल रोजी कर्जत येथील पोलीस मैदानात आयोजित भीम महोत्सवात रात्री शिंदेशाही हा भीम गीतांचा कार्यक्रम आघाडीचे गायक मिलिंद शिंदे सादर करणार आहेत. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 30 एप्रिल रोजी कर्जत तालुका समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक कर्जत शहरात काढण्यात येणार आहे. नियोजन बहुजन समाज समिती करीत आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply