Breaking News

जलजीवन मिशन अंतर्गत शिवसणई येथे पाण्याची टाकी

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवसणई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिमपूजन सोहळा बुधवारी (दि. 24) आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
पनवेल तालुक्याचा सर्वांगिण विकास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील शिवसणई गावात केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही टाकी उभारणीच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील, सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच निराबाई चौधरी, सदस्य रमेश पाटील, कलावती पाटील, विश्वास पाटील, विठ्ठल पाटील, भिमा गोसावी, संदेश पालंडे, भाग्यश्री पवार, ताराबाई पालांडे, अमित पालकर, राजेश भोपी, भालचंद्र भोपी, जगन वाघमारे, सुरेखा कातकरी, सुशिल वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply