पुणे ः प्रतिनिधी
लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या 172व्या जयंतीनिमित्त पॅट फार्मास्य्ाुटिकल्स प्रा. लि. पनवेलतर्फे महर्षी आण्णासाहेबांच्या तेरापंथी काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात पुणे येथे अनावरण करण्यात आले.
हे अनावरण अण्णासाहेबांचे पणतू जावई विनायक कृष्णाजी गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन औषधाविषयी माहिती देताना पॅट फार्माचे मालक मनोहर पटवर्धन म्हणाले की, महर्षी अण्णासाहेबांची अनेक आय्ाुर्वेदिक औषधे व काढे प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्षे अनेक रोगांवर हे काढे आणि औषधे लोकांच्या उपयोगी येत आहेत, परंतु आताच्या काळात काढे बनविणे, त्यासाठी लागणारी वनस्पती गोळा करणे हे तितके सोपे राहिले नाही.
म्हणूनच या काढ्यांपैकी तेरापंथी काढा या एका काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात औषध तयार केले. (चअझ 13 ढरलश्रशीीं) हे औषध घ्यायला सोपे आणि तितकेच प्रभावी आहे. यामध्ये अण्णासाहेबांच्या ग्रंथात दिल्याप्रमाणे 13 औषधे वापरली आहेत. जेष्ठीमध, गुळवेल, पुनर्नवा, धमासा, एरंडमूळ, रिंगणी, सुंठ, वावडिंग, बेहेडा, धने, नीमपान, किरायता आणि कुटकी यांचा त्यात समावेश आहे. हे औषध मधुमेह, मेदविकार, त्वचाविकार, रक्तदाब, त्रिदोष अशा अनेक आजारांवर गुणकारी आहे.
सदर कार्यक्रम महर्षी अण्णासाहेब पटवर्धन समाधी मंदिराच्या आवारात घेण्यात आला. या वेळी समाधी मंदिर ट्रस्टचे अभ्यंकर, अण्णासाहेबांचे पणतू अशोक पटवर्धन, आय्ाुर्वेदतज्ज्ञ डॉ. शास्त्री, समाधी मंदिर ट्रस्टचे श्रीकृष्ण काळे, शताय्ाू आय्ाुर्वेदचे अभय देव, पॅट फार्माचे अभिषेक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.