खारघर : प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अपोलो डायग्नॉस्टिक्सच्या सौजन्याने आणि खारघर येथील व्हीएसपी ग्रुप आणि ओम साई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून ना नफा ना तोटा या तत्त्वावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच पूजेचे साहित्य वितरित करण्यात येते. यंदाही मूर्ती व साहित्याचे वितरण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
खारघर सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, एन. सुब्रमण्यम, अपोलो डायग्नॉस्टिक्सच्या संध्या राणी, व्हीएसपी ग्रुपचे श्री. राम, साई मंदिर प्रतिष्ठान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुदर्शन नाईक, एन. संध्या यांच्यासह पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.
या वेळी परेश ठाकूर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले तसेच व्हीएसपी ग्रुप आणि ओम साई प्रतिष्ठान ट्रस्टने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …