Breaking News

संजयआप्पा ढवळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील तळाशेत (इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना अविष्कार फाउंडेशनच्या रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. अविष्कार फाउंडेशनतर्फे दरवर्षी  विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2022च्या समाजभूषण पुरस्कारासाठी संजयआप्पा ढवळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. श्रीवर्धन येथील कुलकर्णी भाई बिरादर हॉलमध्ये रविवारी (25 सप्टेंबर)  सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संजयआप्पा ढवळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply