Breaking News

लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान

उरण : बातमीदार

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि विमानतळ बाधित गावांना न्याय मिळावा यासाठी काम बंद आंदोलन केले. त्यासंदर्भात घणसोली, गोठीवली, जुहुगाव, वाशी, दापोली, ओवळा या गावांत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनजागृती अभियान करण्यात आले. यामध्ये गीतकार, संगीतकार, गायक तेजस पाटील, गायिका सपना पाटील, गायक समाधान फोफेरकर, ढोलकी वादक मिलिंद कडू, कीबोर्ड वादक रूपेश म्हात्रे या सर्वांनी गावागावांत जाऊन गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply