मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार एसएमडीएल. कॉलेजचे प्रो. डॉ. बबन भिवसेन जाधव यांना देण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते पाच हजार रु. पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय त्यांना ज्ञानज्योती संस्थेचा ज्ञानभूषण पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. जाधव यांनी आदर्श शिक्षकाच्या पारितोषिक रकमेत भर टाकून जाधव यांनी बँकेत ठेवून व्याजातून कायमस्वरूपी शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्षाच्या एनएसएसच्या आदर्श स्वयंसेवकास आणि आदर्श स्वयंसेविकेस प्रमाणपत्र व 500 रु. पारितोषिक देण्याचे घोषित केले.