Breaking News

जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये 13 ऑक्टोबरला निवडणूक

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यातील एक हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे.  त्यात रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कोतवाल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील खेरणे, पेण तालुक्यातील कोपर, पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाड तालुक्यातील खरवली, माणगाव तालुक्यातील देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या ग्रामपंचायतीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होईल. संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर  रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबरला होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत ) आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल.

 

मतदान होणार्‍या ग्रामपंचायती

अलिबाग : वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली,

कर्जत : पोटल, पाली तर्फे कोतवाल खलाटी,

खालापूर : चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव,

पनवेल : खेरणे,  पेण : कोपर,   महाड :  खरवली,

पोलादपूर : तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी,

माणगाव :  देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द

श्रीवर्धन :   आदगाव

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply