पनवेल ः रामप्रहर वृत्त
वीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांना स्नेहकुंज आधारगृह, क्षितिज पर्व, संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, जनाधर्मा आधारगृह आणि द्वारकादास शामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अर्चना ठाकूर नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक नितीन जोशी, जनाधर्मा आधारगृहाच्या सहसचिव दिपाली पारसकर, क्षितिज पर्वचे निवेदक अनुप चंदने यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणार्या अर्चना ठाकूर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …