Breaking News

मंगेश वाघमारेंच्या अपघाताची सखोल चौकशीची मागणी

पाली : प्रतिनिधी

पालीतील विश्रामगृहात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी उशिरा सुधागड तालुक्यातील सर्व पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचा पाली-खोपोली मार्गावर खालापूर तालुका हद्दीतील तुकसई गावाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. हा अपघात व मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याचा सखोल तपास व चौकशी पोलिसांनी करावी आणि संबंधित गुन्हेगाराला पकडावे, अशी मागणी या बैठकीत सुधागड तालुक्यातील पत्रकारांनी केली. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र ओव्हाळ, राजेंद्र मेहता, धम्मशील सावंत, गौसखान पठाण, दत्तात्रेय दळवी, मंगेश यादव, अमित गायकवाड, निलेश धारिया, निशांत पवार, महेंद्र निकुंभ, प्रशांत हिंगणे व निवास सोनावळे आदी पत्रकार उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply