Breaking News

‘शिव संकल्प’चा गणेशोत्सव उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त

शिव संकल्प सोसायटी गणेश उत्सव मंडळ प्लॉट नंबर 20 सेक्टर 36 कामोठे येथील शिवसंकल्प सोसायटीतील रहिवाशांद्वारे कोरोना काळानंतरचा पहिला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोसायटीतील स्त्री पुरुष आबालवृद्ध आणि लहान बालगोपाल मंडळी मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आरतीला एकत्रित येत असतात.

सोसायटीतील लहान मुला मुलींच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी मंडळातर्फे यावर्षी चमचा लिंबू स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने लहान मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर  आदींनीदेखील या गणरायाची दर्शन घेतले.

अध्यक्ष नानासाहेब वलेकर, खजिनदार  आलम शेख आणि राजेश धनावडे, अशोक मिसाळ, अशोक महाडिक, किरण भोर, रोहन गावकर, दयानंद राऊत, बाळासाहेब दुधाळ, आनंद उथळ, अविनाश मोरे, संतोष पांढरे, संतोष शेटे, सचिन जाधव, विलास जाधव, नरेंद्र दाभोलकर, विनोद गायकवाड, प्रकाश कुलकर्णी, संदिप संत्रा यांच्या परिश्रमाने गणेश उत्सव उत्साहात साजरा होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply