Breaking News

रयत बँकेच्या वार्षिक अहवालाचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्ष 2021-22 च्या 82 व्या वार्षिक अहवालाचे विरतरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, गुरूकुल प्रमुख संदीप भोईर यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर, उपशिक्षक एकनाथ ठाकूर व सागर रंधवे तसेच उपशिक्षिका वृषाली म्हात्रे व सर्व सेवक उपस्थित होते. विद्यालयाचे गुरूकुल प्रमुख संदीप भोईर यांना या वेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply